योगगुरू रामदेव बाबांच्या भावावर अपहरणाचा गुन्हा , Cong trying to defame me: Ramdev

योगगुरू रामदेव बाबांच्या भावावर अपहरणाचा गुन्हा

योगगुरू रामदेव बाबांच्या भावावर अपहरणाचा गुन्हा
www.24taas.com , वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सरकार लोकशाहीची थट्टा उडवत आहे. भाऊ राम भरतवर गुन्हा दाखल झाल्यानं योगगुरू रामदेव बाबांनी सरकारवर नव्यानं हल्लाबोल केला आहे.

योगगुरू रामदेव बाबा यांचा भाऊ राम भरत याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी सोमवारी हरिद्वार येथील पतंजलि फेज दोनमधील आश्रमावर छापा मारून नितीन त्यागी या युवकाला जखमी अवस्थेत ताब्यात घेतले. तिथून आणखी चार जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

या सर्वांचे अपहरण करून त्यांना याठिकाणी ठेवण्यात आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या राम भरत याच्यासह त्याचा सहकारी नरेश मलिक यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र रामदेव बाबांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत सरकार लोकशाहीची थट्टा करत असल्याचा आरोप केलाय.

नितीन त्यागी हा रामदेव बाबांच्या आश्रमातून काम सोडून दुसऱ्या ठिकाणी नोकरी करत होता. नितीनचे हे वर्तन राम भरत यांना न आवडल्यामुळे त्यांना त्याचे अपहरण करून पतंजली योगपीठात ठेवले. नितीनच्या वडीलांना मुख्यमंत्र्यांपर्यंत हे प्रकरण नेल्यामुळे पोलिसांनी कारवाई करत आश्रमातून नितीनची सुटका केली. तसेच आणखी चार जणांनाही सोडविण्यात आले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 22, 2013, 14:01


comments powered by Disqus