भाजपला भ्रष्टाचार दिसत नाही - राहुल,Congress brought IT revolution, BJP made fun of it: Rahul Gandhi

भाजपला स्वत:चा भ्रष्टाचार दिसत नाही - राहुल

भाजपला स्वत:चा भ्रष्टाचार दिसत नाही - राहुल
www.24taas.com, झी मीडिया, बेळगाव

भाजपला स्वत:चा भ्रष्टाचार दिसत नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचा बेळगावात केला. भाजपच्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं, असा चिमटा राहुल यांनी भाजपला काढला.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज बेळगावमधील जाहीर सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भ्रष्टाचार केल्याबद्दल भाजपच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जावे लागले, १६ भ्रष्ट मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. परंतु भाजपला स्वतःच्या नेत्यांचा भ्रष्टाचार दिसत नाही, अशी तोफ राहुल गांधींनी डागली.

काँग्रेसने आयटी क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. मात्र, भाजपने याचा उलटा प्रचार केला. संगणकामुळे नोकरीवर गदा येईल, असा प्रचार केला. त्यामुळे भाजपचे खरे रूप दिसून येते. काँग्रेस प्रचारासाठी बेळगावमध्ये राहुल गांधींच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात होतं. यासाठी बेळगावमधल्या जनतेचं लक्ष वेधण्याचं काम काँग्रेसने राहुल सभेच्या माध्यमातून केले. राहुल सभेसाठी भव्य शामियान उभारण्यात आला होता. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असल्यानं प्रशासनाचा उपयोग या प्रचारसभेसाठी करण्यात आला. तर कोच्चीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची सभा होत आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 15, 2014, 15:13


comments powered by Disqus