Last Updated: Tuesday, September 25, 2012, 10:14
www.24taas.com, नवी दिल्लीकेंद्रीय मंत्रिमंडळातल्या संभाव्य फेरबदलांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळात 10 मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच राहुल गांधींना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे अशी चर्चा आहे.
सोनियांच्या 10 जनपथ या निवासस्थानी काँग्रेस कमिटीची बैठक सुरु झालीये. या बैठकीसाठी राहुल गांधी, शिला दीक्षित, जनार्दन द्विवेदी, अहमद पटेल, मुकुल वासनिक, गुलामनबी आझाद, विलास मुत्तेमवार हे काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत.
या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, पक्षसंघटनेतील बदल आणि तेलंगणाच्या मुद्यावर पक्षाची भूमिका ठरवण्यात येणार आहे.
First Published: Tuesday, September 25, 2012, 10:14