काँग्रेसचं मोदींवर टीकास्त्र, Congress criticises modi

काँग्रेसचं मोदींवर टीकास्त्र

काँग्रेसचं मोदींवर टीकास्त्र
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सरदार वल्लभभाई पटेलांच्या जन्मभूमी गुजरातमध्ये त्यांचं एक भव्य स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या नावाने उभारण्याचा निर्धार मोदींनी केलाय. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट मोठा असा हा पुतळा असणार आहे.

मोदींच्या या घोषणेवर काँग्रेसने जोरदार टीका केलीय. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा करण्याच्या गोष्टी करणा-या मोदींनी आजपर्यंत पटेलांचा ५ फुटांचा पुतळाही उभारलेला नाही अशी टीका राजीव शुक्ला यांनी केलीय.

गुजरातमध्ये सध्या बनत असलेला सरदार वल्लभभाई पटेलांचा एकमेव पुतळाही काँग्रेस सरकार बनवत असल्याचं राजीव शुक्ला म्हणाले आहेत. नरेंद्र मोदींच्या पहिल्याच भाषणाने जोरदार वादळ निर्माण केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, September 15, 2013, 23:18


comments powered by Disqus