Last Updated: Sunday, December 8, 2013, 16:49
www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली काँग्रेसचं भ्रष्ट राजकारण आणि राहुल गांधी यांच्यामुळे निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, अशी टीका रामदेव बाबा यांनी केली आहे. चुकीच्या धोरणांमुळे जनतेनं काँग्रेसला नाकारलं, असं रामदेव बाबा म्हणालेत.
रामदेव बाबा यांनी आम आदमी पक्षालाही पाठिंबा दिला. भ्रष्टाचारामुळे काँग्रेसचा पराभव झालाय, असे रामदेव बाबांनी सांगताना आम आदमी पार्टीचं अभिनंदन केलं.
दिल्ली निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमीने मोठी झेप मारत अनेक वर्षे दिल्लीच्या सत्तेत राहणाऱ्या काँग्रेचा सफाया केलाय. मुख्य म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव अरविंद केजरीवाल यांनी केला. २२ हजार मताधिक्याने विजय मिळवला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, December 8, 2013, 16:33