मोदी नालायक मुख्यमंत्रीः काँग्रेस, congress leaders calls narendra modi nalayak

मोदी नालायक मुख्यमंत्रीः काँग्रेस

मोदी नालायक मुख्यमंत्रीः काँग्रेस
www.24taas.com, अहमदाबाद

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी नालायक असून मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. बडोदा येथे कॉंग्रेसने जन विजय निराधार संमेलन आयोजित केले होते.

त्या वेळी कॉंग्रेस नेत्यांनी मोदींवर कडाडून टीका केली. तसेच गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त करुन कार्यकर्त्यांना दिवाळी 20 डिसेंबर रोजी साजरी करण्याचे आवाहन करण्यांत आले.

कार्यक्रमात गुजरात काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. शंकरसिंह वाघेला, प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाडीया, सिद्धार्थ पटेल, भरत सोळंकी इत्यादी नेते मंडळींनी मोदींवर टीका केली. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर वैयक्तीक टीका न करण्यांचा इशारा या नेत्यांनी मोदींना दिला.

माजी खासदार मनुभाई पटेल यांनी मोदींना मुख्यमंत्रीपदासाठी नालायक असल्याची टीका केली. तर वाघेला म्हणाले, कार्यकर्त्यांनी दिवाळी २० डिसेंबरला साजरी करावी. नविन वर्षाच्या शुभेच्छा देताना प्रत्येक कार्यकर्त्या‍ने `भाजपला सत्तेतून हाकलून लावा`, असा संदेश दिला पाहिजे.

मोधवाडीया यांनी मोदींना काँग्रेस नेत्यांवर वैयक्तीक टीका न करण्यातचा इशारा देताना सांगितले, त्यांनी गुजरातच्या जनतेला स्वतःच्या विवाहाबद्दलचे वास्तव उघड केले पाहिजे.

First Published: Saturday, November 3, 2012, 15:11


comments powered by Disqus