Last Updated: Tuesday, December 24, 2013, 20:24
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदिल्लीमध्ये आम आदमी पक्ष २६ डिसेंबर म्हणजे उद्या सरकार बनवत आहे. दुसरीकडे ‘आप’ला बाहेरून पाठिंबा देणारा काँग्रस पक्ष पाठिंबा काढून घेण्याच्या तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आम आदमी पक्षाला दिलेल्या समर्थनामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेस पाठिंबा मागे घेण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे दिल्लीत सरकार बनविण्यापूर्वी आम आदमी पक्षात बंडाचे वारे वाहत आहेत. माहितीनुसार, लक्ष्मीनगर विधानसभेवरून निवडून आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षाशी विद्रोह करण्याच्या तयारीत आहेत.
नुकतंच, ‘आप’नं आपल्या मंत्रिमंडळातील संभाव्य सहा नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये, आपल्या नावाचा समावेश नसल्यानं बिन्नी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी धडकले. त्यांच्याशी काही वेळ झालेल्या चर्चेनंतर ते क्रोधात बाहेर पडले. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी एव्हढंच म्हटलं की, ‘उद्या मी मोठा खुलासा करेन’ आणि त्यांनी काढता पाय घेतला.
आम आदमी पार्टी उद्या दिल्लीत सत्ता स्थापन करण्याची चिन्हं आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासहीत अनेक मंत्री उद्या शपथ घेणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 24, 2013, 20:24