आसाराम बापूची जेलमध्ये भलतीच मागणी, Controversial spiritual guru Asaram Bapu, Should Bapu female doctor

आसाराम बापूची जेलमध्ये भलतीच मागणी

आसाराम बापूची जेलमध्ये भलतीच मागणी
www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्ली

न्यायालयीन कोठडीत असलेले वादग्रस्त अध्यात्मिक गुरु आसाराम बापू आता जास्तच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय. जोधपूर पोलीस सध्य़ा एका सिडीच्या शोधात आहेत. तपासात जर ती सीडी सापडली तर आसाराम बापूंची संकट वाढणार आहेत. दरम्यान, आसाराम बापूंनी आजारावर उपचारासाठी एका महिला वैद्यची मागणी जेल प्रशासनाकडे केली आहे.

या सिडीच्या शोधासोबतच शिल्पी आणि गनर रणवीर यांचाही तपास सुरु आहे. या तपासाप्रकरणी पोलिसांनी आसाराम बापूंचा सहकारी शिवा याला अहमदाबादला नेण्यात आलय. शिवाने मात्र आसाराम बापूंना गोवण्यासाठी पोलिसांचं कट कारस्थान असल्याचं घुमजाव केलंय. जोधपूर पोलिसांना आसाराम बापूंच्या अहमदाबादमधील आश्रमावर छापा टाकून महत्वाचे दस्ताऐवज ताब्यात घेतलेत.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या संत आसाराम बापूंच्या आता आणखी काही गोष्टींचा उलगडा होऊ लागला आहे. आसाराम यांचा खास सहकारी शिवा याने पोलिसांसमोर अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. आसाराम बापूच्या अश्लील कृत्याबद्दल आश्रमातील शिवाने माहिती दिली आहे. त्यानंतर मस्थती करणारी महिलेचा चेहरा मीडियासमोर प्रथमच आला आहे.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा गुरूकुलातील हॉस्टेल वॉर्डन शिल्पीसोबत संबंध असल्याची माहितीही शिवाने दिली आहे. शिल्पीचा हा चेहरा प्रथमच मीडियासमोर आला आहे. शिल्पी आसाराम बापूने केलेल्या अनेक कृत्यामध्ये बरोबरीची सहकारी आहे. फरार झालेल्या शिल्पीचे नाव हे शिल्पी नसून संचिता गुप्ता आहे आणि ती महाराष्ट्रातच कुठंतरी लपून राहली आहे, असे वृत्त आहे.

आसारामच्या बलात्कार प्रकरणाच्या केसची लगेचच कोर्टात सुनावणी केली पाहिजे, असे वकिलांने सांगितले. आसारामचा सहकारी शिवा आणि शिल्पी यांनाच कोर्टात सरकारी साक्षीदार म्हणून उभे करण्याचा विचार केला जात आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, शिल्पी या केसचा महत्त्वाचा पुरावा आहे. शिवा हा शिल्पी आणि आसारामच्या मध्यस्ती होता. पिडित मुलीवर एका वाईट आत्माचे सावट आहे आणि यातून फक्त आसारामच तिला बाहेर काढू शकतात, हे सांगून तिला आसाराम बापूंकडे पाठविले. तिच्या आई वडिलांनी त्या मुलीला जोधपूर किंवा अहमदाबादच्या आश्रमात पाठवण्यासाठी तयार व्हावे, यासाठी शिल्पी सतत त्यांच्या संपर्कात होती, अशी माहिता या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

शिल्पी, शिवा आणि मुलीचे आई-वडील यांचे १३ ते १५ ऑगस्टपर्यंत अनेक वेळा फोनवर बोलणे झाले होते. १५ ऑगस्टला त्या १६ वर्षीय मुलीचे मनाई आश्रममध्ये शोषण केले गेले आहे. याबाबची सीडी पोलिसांनी न्यायालयात सादर केली आहे. पोलिसांना ही केस मजबूत करायची असल्याने त्यांनी सीडीच्यामाध्यमातून ही माहिती कोर्टाला सादर केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, September 6, 2013, 15:03


comments powered by Disqus