पोलीस ठाण्यात गोळ्या घालून दोघांची हत्या,Cop shot dead inside police station in Bihar

पोलीस ठाण्यात गोळ्या घालून दोघांची हत्या

www.24taas.com, झी मीडिया, पाटणा

बिहारमध्ये पुन्हा गुंडाराज पाहायला मिळाले. पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकारी आणि तक्रार नोंदविण्यावर गोळ्या झाडण्यात आल्यात. यामध्ये दोघांचा बळी गेलाय.

बिहारमधील वैशाली जिल्ह्यात ही घटना घटलेय. दोन गटांमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच तक्रारदारावर गोळी झाडून हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली.

बिहारमध्ये पुन्हा गुंडाराज सुरू असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झालेय. वैशाली जिल्ह्यातील जुडावनपूर या गावातील माजी सरंपच आणि चौकीदाराच्या मुलात भांडण झाले होते. हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलीस निरीक्षक अनिल कुमार यांनी दोन्ही गटांमधील भांडण सामंजस्याने सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, त्याचा काहीही परीणाम झाला नाही.

भांडण सोडविण्याच्यादरम्यान माजी सरपंच आणि त्यांच्या साथीदारांनी अनिल कुमार यांच्यावर गोळी झाडून झाडली. यात त्यांना आपला प्राण गमवावा लागला. तसेच माजी सरपंच याचे ज्याच्याशी भांडण झाले होते त्या चौकीदारावर गोळ्या झाडण्यात आल्यात.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 2, 2014, 10:52


comments powered by Disqus