‘आप’ हमे अच्छे लगने लगे! कॉर्पोरेट विश्व वळलं ‘आप’कडे!corporate World turned to the AAP, join Aam Aa

‘आप’ हमे अच्छे लगने लगे! कॉर्पोरेट विश्व वळलं ‘आप’कडे!

‘आप’ हमे अच्छे लगने लगे! कॉर्पोरेट विश्व वळलं ‘आप’कडे!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आम आदमी पार्टीनं केवळ दिल्लीकरांवरच जादू केलेली नाही... तर कॉर्पोरेट विश्वातील `बिग बॉस` मंडळींसोबतच सामान्य नागरिकांवरही अरविंद केजरीवालांच्या या नव्या राजकीय पक्षानं गारूड केलंय... गेल्या ८ डिसेंबरला दिल्लीचा निकाल लागल्यापासून, जवळपास ४ लाखांहून अधिक लोकांनी `आप`चं सदस्यत्व स्वीकारलंय...

इन्फोसिसचे बोर्ड मेंबर व्ही. बालकृष्णन... हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिकलेल्या रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडच्या सीईओ मीरा संन्याल... लालबहादूर शास्त्रींचे नातू आणि अॅपलचे पश्चिम भारत प्रमुख आदर्श शास्त्री... कॉर्पोरेट जगतात आपापल्या करिअरमध्ये अत्युच्च स्थानावर विराजमान असलेली ही मान्यवर मंडळी... सध्या यांना मोहिनी घातलीय ती आम आदमी पार्टी नावाच्या राजकीय पक्षानं... आपापल्या पदांवर पाणी सोडून ही मंडळी राजकारणात प्रवेश करतायत. ते देखील अरविंद केजरीवालांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वी जन्माला घातलेल्या आप नावाच्या पक्षामध्ये... आपली स्वप्नं साकार करण्याची ताकद आपमध्येच आहे, याची त्यांना खात्री पटलीय.
‘आप’ हमे अच्छे लगने लगे! कॉर्पोरेट विश्व वळलं ‘आप’कडे!


केवळ कॉर्पोरेट बॉसेसच नव्हेत, तर सामान्य जनताही आपच्या प्रेमात पडलीय. गेल्या ८ डिसेंबरला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून तब्बल ३ लाख लोकांनी आपचं अधिकृत सदस्यत्व घेतलंय आणि केवळ विशिष्ट राज्यांमध्ये नव्हे, तर देशभरातून आपचे सदस्य आणि कार्यकर्ते वाढतायत. त्याशिवाय तब्बल १ लाख लोकांनी आपचं ऑनलाईन सदस्यत्व स्वीकारलंय. याचाच अर्थ आपच्या कार्यकर्त्यांची संख्या गेल्या महिनाभरात ४ लाखांनी वाढलीय.

विशेष म्हणजे आपच्या खजिन्यातही दिवसागणिक लाखालाखांनी वाढ होतेय. डिसेंबर २०१३ पासून आतापर्यंत आपच्या तिजोरीत तब्बल साडे तीन कोटी रूपये जमा झालेत. दिल्ली निवडणुकीच्या निकालापूर्वी दिवसाला साधारण ७ लाख रूपये जमा होत होते. परंतु निकालानंतर आता दिवसाला साडे सतरा लाख रूपये जमा होतायत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काल आपच्या तिजोरीत ३८ लाख रूपयांची भर पडली. यापूर्वी शांती भूषण यांनी आपसाठी १ कोटी रूपयांची देणगी दिली होती, तर सिंगापूर येथील एका हितचिंतकाने ५० लाख रूपये पाठवले होते.

आम आदमी पार्टी हा राजकीय पक्ष स्थापन करण्याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय महसूल सेवेतील आपल्या नोकरीवर पाणी सोडलं होतं. त्यांचाच कित्ता गिरवत, अनेक कॉर्पोरेट बॉसेस आणि सामान्य नागरिकही आपने घडवलेल्या क्रांतीमध्ये सहभागी होत आहेत. आपचा हा वेग फॉर्म्युला १ पेक्षाही तेज आणि चित्तथरारक आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


पाहा व्हिडिओ


First Published: Thursday, January 2, 2014, 22:24


comments powered by Disqus