प्रेमी युगुलाला काळं फासून गावकऱ्यांनी काढली धिंड!, couple harassment by villagers in dhar, madhya p

प्रेमी युगुलाला काळं फासून गावकऱ्यांनी काढली धिंड!

प्रेमी युगुलाला काळं फासून गावकऱ्यांनी काढली धिंड!
www.24taas.com, झी मीडिया, इंदौर

मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. जिह्यातल्या बलवारी गावात प्रेमविवाह केल्यानं एका जोडप्याला गावकऱ्यांनी जहरी शिक्षा दिलीय.

बलवारी पंचायतच्या खोकरिया गावात मंगळवारी सकाळी ही घटना घडलीय. पहाटेच या प्रेमी युगुलाला पकडून आणून गावकऱ्यांनी एका खांबाला बांधलं आणि दोघांनाही बेदम मारहाण केली. गावकऱ्यांनी त्यांच्या चेहऱ्याला काळं फासलं. मात्र, एवढ्यावरच गावकऱ्यांचं समाधान झालं नाही. गावकऱ्यांनी या जोडप्याचे कपडे काढून त्यांची गावभर धिंड काढली. दोघांना काळं फासून कमरेच्या खाली एक थैली बांधून या जोडप्याला तीन गावांमध्ये फिरवण्यात आलं. यावेळे संबंधित युवकाच्या हातात थाळी देऊन त्याला ती वाजवण्यास सांगितलं गेलं. धक्कादायक म्हणजे गावकऱ्यांमध्ये काही महिलांचाही समावेश होता.

मात्र, या सर्वप्रकाराची पोलिसांना कल्पना दिल्यानंतरही त्यांनी गंभीर दखल न घेता घडलेल्या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. पोलिसांत तक्रार करण्यासाठी युवक-युवतीचे कुटुंबीय पोलीस स्टेशनमध्ये गेले होते... पोलिसांनी त्यांचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं परंतु तक्रार मात्र नोंदवली गेली नाही. मात्र, माध्यमांनी हा संतापजनक प्रकार दाखवल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांवरील दबाव वाढला. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी २० जणांना अटक केली. बलवारी गावचे सरपंच आणि ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 16, 2013, 16:38


comments powered by Disqus