Last Updated: Sunday, July 14, 2013, 14:43
www.24taas.com, झी मीडिया, अलाहाबादउत्तर प्रदेशातील 'ऑनर किलिंग' प्रकरणातील सात आरोपींची न्यायालयाने सहिसलामत सुटका केलीय. बदायू जिल्हाच्या गुन्नौर या परिसरात एका जोडप्याचे तुकडे करून त्यांना जाळून टाकल्याचा आरोप या आरोपींवर ठेवण्यात आला होता. या गुन्ह्याखाली त्यांनी खालच्या कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली होती. पण, उच्च न्यायालयात मात्र त्यांची सुटका करण्यात आलीय.
महत्त्वाचं म्हणजे 'ऑनर किलिंग'सारख्या प्रकरणात पोलिसांची भूमिका मह्त्त्वाची ठरते, असं वक्तव्य या प्रकरणाचा निर्णय देताना पोलिसांनी नमूद केलंय. न्यायाधीश अमर सरन आणि न्यायाधीश पंकज नकवी यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय. २३ मे २००६ ला गुन्नौर या परिसरात दिनद्याल आणि अनिता या प्रेमी जोडप्याची हत्या करण्यात आली होती.
या केसमध्ये चाचणी न्यायालयात ३० जुलैला २०१२ ला अनिताचे वडील नथ्थू आणि चुलत भाऊ राकेश, वीरेश, महाबीर, जयप्रकाश, पप्पू, आणि गुलाबसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच त्यांना २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला होता. त्यानंतर या आरोपींनी फाशीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. उच्च न्यायालयाने यावेळी अपुऱ्या पुराव्यांचं कारण देत उच्च न्यायालयानं या आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, July 14, 2013, 13:26