Last Updated: Friday, August 30, 2013, 19:54
www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता कोलकात्याच्या चांदणी चौक परिसरात आज दुपारच्या सुमारास स्फोट झाला. क्रूड बॉम्बच्या साहाय्यानं हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याचं प्रथमदर्शनी सांगण्यात आलंय.
या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. हा स्फोट कमी शक्तीशाली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान या परिसरात आणखी एक गावठी बॉम्ब सापडल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, August 30, 2013, 19:54