राष्ट्रकुल घोटाळा - सुरेश कलमाडींवर आरोप निश्चित , CWG Scam: Kalmadi and nine other accused charged

राष्ट्रकुल घोटाळा - सुरेश कलमाडींवर आरोप निश्चित

राष्ट्रकुल घोटाळा - सुरेश कलमाडींवर आरोप निश्चित
www.24taas.com,नवी दिल्ली

राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी संयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडींसह इतर आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आलेत. आज दिल्लीतल्या पटियाला कोर्टामध्ये आरोप निश्चित करण्यात आले.

भ्रष्टाचार, फसवणूक आणि कट कारस्थान करणे असे विविध आरोप निश्चित करण्यात आलेत. २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ९० कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप कलमाडींवर आहे. विशेष सीबीआय कोर्टानं हे आरोप निश्चित केलेत.

संयोजन समितीचे माजी सचिव ललित भानोत, व्ही. के. वर्मा, सुरजित लाल, ए.एस व्ही प्रसाद आणि एम जयाचंद्रन हे याप्रकरणी सहआरोपी आहेत. कलमाडींनी हे आरोप अमान्य केलेत. या प्रकरणाची सुनावणी २० फेब्रुवारीपासून होणार आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्यात अडकलेल्या कलमाडी आणखी अडचणीत आलेत.

First Published: Monday, February 4, 2013, 11:46


comments powered by Disqus