Last Updated: Friday, December 21, 2012, 12:12
www.24taas.com, नवी दिल्लीसुरेश कलमाडींना दिल्ली कोर्टानं दणका दिल्यामुळे त्यांच्या सुरेश अडचणी आणखी वाढल्या आहेत. कॉमनवेल्थ घोटाळ्यात कलमाडींसहित ११ जणांवर आरोप निश्चित करा असे आदेश कोर्टानं दिले आहेत.
कोर्टानं कलमाडींविरोधात कट रचणे, भ्रष्टाचार, फसवणूकीसंदर्भात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयनं सुरेश कलमाडी आणि आयोजन समितीचे महासचिव ललित भानोत यांच्याशिवाय अन्य नऊ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.
सुरेश कलमाडी आणि आयोजन समितीचे महासचिव ललित भनोत आणि त्यांच्याव्यतिरिक्त इतर काही जणांवरही सीबीआयने आरोप पत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
First Published: Friday, December 21, 2012, 12:12