Last Updated: Wednesday, November 27, 2013, 10:53
www.24taas.com, झी मीडिया, हैदराबादलहेर चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. ऊद्या दुपारपर्यंत हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकेल अशी शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यसरकारने या नैसर्गीक आपत्तीचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे चक्रिवादळ सध्या काकिनाडाच्या आग्नेयेस ९२० किलोमिटरवर असून २८ तारखेच्या दुपारी हे वादळ मछलीपट्टण आणि कलिंगपट्टणचा भाग पार करेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवलाय. या वादळामुळे आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
कृष्णा, पूर्व आणि पश्चीम गोदावरी, विशाखा पट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम आणि गुंटूंर या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. याआधी फायलिन आणि हेलेन वादळाचा जोरदार फटका बसला होता. आता लहेर वादळाची भीती आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, November 27, 2013, 10:53