तयार राहा... सिलिंडरसाठी मोजावे लागणार आणखी १०९ रुपये, cylinder with subsidy & price hike

तयार राहा... सिलिंडरसाठी आणखी १०९ रुपये मोजण्यासाठी!

तयार राहा... सिलिंडरसाठी आणखी १०९ रुपये मोजण्यासाठी!
www.24taas.com, नवी दिल्ली

घरगुती गॅस सिलिंडर आणखी १०९ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. जर केंद्र सरकारनं सध्या अस्तित्वात असलेल्या सबसिडीयुक्त घरगुती गॅस सिलिंडर वाढवण्याचा निर्णय घेतला तर या सिलिंडरच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

सध्या सबसिडीयुक्त केवळ सहा गॅस सिलिंडर उपभोक्त्यांना मिळत आहेत. या सबिसिडीच्या सिलिंडरची संख्या सहा वरून नऊ झाली तर या सिलिंडरच्या किंमतीत वाढ होणार आहे. सबसिडीयुक्त सिलिंडरची संख्या वाढली तर त्याच्या किंमतीत १०० रुपयांपेक्षा जास्त वाढ होऊ शकते.

गुजरात निवडणुकीनंतर सबसिडीयुक्त सिलिंडरची संख्या सहावरून नऊ करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकार करण्याच्या तयारीत आहे. अशा वेळेस केंद्र सरकारवर तब्बल ९००० करोड रुपयांचा बोझा पडणार आहे. सरकारवरचं हे ओझं कमी करायचं असेल तर ते सामान्यांकडून वसूल केलं जाईल. साजहिजकच, सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात काँग्रेसच्या कोअर कमिटीत गॅस सिलिंडरच्या किंमती वाढविण्याच्या निर्णयावरच जोर दिला जाण्याची शक्यता अधिक आहे.

First Published: Friday, December 14, 2012, 16:18


comments powered by Disqus