Last Updated: Thursday, January 17, 2013, 13:40
www.24taas.com, नवी दिल्ली घरगुती सिलिंडर आता सहावरून नऊवर करून खुश खबर केंद्राने दिली आहे. मार्चपर्यंत सहा अनुदानित सिलिंडरवर जादा अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे आता सहा ऐवजी नऊ सिलिंडर मिळणार आहेत.
केंद्र सरकारने प्रत्येक कुटुंबाला सहा अनुदानित सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. या निर्णयावर देशभरात तीव्र संताप व्यक्त होत होता. ७०० ते ९११ रूपये मोजावे लागणार असल्याने देशात आंदोलनाची ठिणगी उडाली होती.
अखेर काँग्रेस प्रणित केंद्र सरकारने आज तातडीने बैठक घेत अनुदानित नऊ सिलिंडर देण्याचे जाहीर केले.
First Published: Thursday, January 17, 2013, 13:30