चेकवरील सही चुकली तर....नक्की तुरुंगवास, Czech the wrong sign, the jail

चेकवरील सही चुकली तर....नक्की तुरुंगवास

चेकवरील सही चुकली तर....नक्की तुरुंगवास
www.24taas.com,नवी दिल्ली

तुम्ही दिलेल्या चेकवरी सही अथवा स्वाक्षरी चुकली तर... असा कधी प्रश्न आपल्याला पडला आहे का? नसेल तर तो आता तुम्हाला महागात पडेल हे मात्र, नक्की. कारण तुम्ही दिलेल्या चेकवरील सही चुकली तर तुम्हाला तुरुंगवास हा होणारच. त्यामुळे आता खातेदारांनी संभाळून राहा.

तुमची चेकवरची सही ही बँकेतल्या सहीशी तंतोतंत जुळायलाच हवी. कारण सहीतल्या फरकामुळे चेक बाऊन्स झाला तर खातेदारावर फौजदारी कारवाई खुशाल करा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आता दिला आहे. त्यामुळे तुमचे काही खरे नाही.

खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे चेक बाऊन्स झाला तर फौजदारी कारवाई करता येते, पण खातेदाराची सही न जुळल्यास फौजदारी कारवाई करता येत नाही असा गुजरात उच्च न्यायालयाने याआधी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि न्यायमूर्ती ग्यान सुधा मिश्रा यांच्या खंडपीठाने रद्दबातल ठरवला आहे.

चेक बाऊन्स होण्याचे कारण अपुरी रक्कम, सहीतली तफावत वा आणखी काही असो, खातेदाराचे स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर फौजदारी कारवाई करा, असे सर्वोच्च न्यायालय स्पष्ट केले आहे.

First Published: Monday, December 3, 2012, 08:43


comments powered by Disqus