Last Updated: Friday, April 19, 2013, 10:59
www.24taas.com, मुंबई केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर... केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात तब्बल आठ टक्के वाढ करण्यात आलीय.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत ७२ टक्के महागाई भत्ता मिळत होता. हाच महागाई भत्ता आता ८० टक्क्यांवर केला गेलाय.
केंद्रीय सेवेतील सुमारे पन्नास लाख कर्मचाऱ्यांना आणि तीस लाख पेन्शनर्सना याचा फायदा होणार आहे. १ जानेवारी २०१३ पासून हा भत्ता दिला जाणार आहे.
First Published: Friday, April 19, 2013, 10:22