Last Updated: Monday, May 19, 2014, 16:30
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदिल्लीच्या एका मुलाने आपल्या वडिलांची मस्करी करण्याचा प्लॅन केला. त्याने आपल्या खोलीत एक कॅमेरा लावला आणि रेकॉर्डिंग ऑन केली. जसे त्याचे वडील खोलीत आले, त्याने सांगितले की, त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नेंट आहे.
त्यानंतर जी काय प्रतिक्रिया आली, त्याची कल्पना कोणी केली नसेल. या गेममध्ये एक चांगली गोष्ट झाली की, जेव्हा यूट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड झाला तेव्हा त्याला जबरदस्त हिट्स मिळाल्या. एकाच आठवड्यात त्याने साडे सात लाखांपेक्षा अधिक हिट्स मिळाले. इंटरनॅशनल मीडियामध्येही ही बातमी खूप हीट होत आहे.
ही संपूर्ण आयडीया होती दिल्लीच्या प्रतीक वर्मा याची. वीस वर्षांच्या प्रतीकला स्वतः पण अंदाजा नसेल की त्याची ही मस्करी त्याला इतकी हीट करेल. आपले वडील सुंदर वर्माची मस्करी करण्यासाठी त्याने व्हिडिओ रिकॉर्डिंग ऑन करून कॅमेरा लपवून ठेवला.
वडील येण्यापूर्वी त्याने कॅमेऱ्यात आपण मस्करी करणार असल्याचे सांगितले होते. वडील खोलीत आले, त्यांना प्रतीकने दरवाजा बंद करण्यास सांगितले, कारण ही गोष्ट आईला समजून नये. मग प्रतीकने खुलासा केला.
प्रतीकने आपल्या वडिलांना सांगितले की, त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नेंट आहे. त्याच्या वडिलांना एकदम राग आला. त्यांनी प्रतीकला मारहाण सुरू केली. किक आणि पंचने चांगली धुलाई केली.
प्रतीकने माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण ते काहीच ऐकायला तयार नव्हते, मग एक पाण्याची बाटली त्याच्या डोक्यात मारणार त्यात प्रतीकने गुपीत उघड केले आणि ही मस्करी असल्याचे सांगितले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 19, 2014, 16:09