प्रेमाचा विरोध केला म्हणून आईला पाजला विषारी चहाDaughter poisonous tea give to drink to mother as a

प्रेमाचा विरोध केला म्हणून आईला पाजला विषारी चहा

प्रेमाचा विरोध केला म्हणून आईला पाजला विषारी चहा
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुरादाबाद

मुरादाबादच्या मझोला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाहपूर इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. प्रेमाला विरोध करणाऱ्या आईला मुलीनं विषारी चहा पाजला. गुरूवारी सकाळी हा प्रकार घडल्यानंतर महिलेच्या शेजाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केलंय. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

शाहपूर इथं राहणाऱ्या विजय सिंह यांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी वीरवती यांनी मुलं शोभारानी, सुभाष, आकाश आणि निखिल यांचा सांभाळ केला. दोन वर्षांपूर्वी शोभारानी हिचे शेजारी राहणाऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध जोडल्या गेले आणि ती त्याच्यासोबत पळून गेली. त्यांनी लग्न केलं आणि ते सहारनपूरमध्ये राहू लागले.

मात्र दोन महिन्यांपूर्वी नवऱ्याचा मार खावून त्रस्त झालेली शोभा माहेरी आईकडे परतली. तर १५ दिवसांपूर्वी शोभाचा नवरा तिला घ्यायला आला. तेव्हा आई वीरवतीनं तिला परत जाण्याचा विरोध केला. बुधवारी संध्याकाळी गावात झालेल्या पंचांच्या बैठकीतही याबाबत निर्णय होऊ शकला नाही. वीरवती कोणत्याही परिस्थितीत शोभाला नवऱ्यासोबत पाठवण्यास तयार नव्हती. त्यानं चिडून शोभानं वीरवतीला गुरूवारी सकाळी विषारी चहा पाजला.

गंभीर परिस्थितीत असलेल्या वीरवतीला शेजाऱ्यांनी आणि तिच्या मुलांनी मिळून हॉस्पिटलमध्ये भर्ती केलंय. आईला बेशुद्ध झालेलं बघताच शोभानं पळ काढला. वीरवतीनं पोलिसांत कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवली नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 14, 2014, 18:19


comments powered by Disqus