दाऊद काय? एक-एक करून सर्वांना आणणार - शिंदे, Dawood can`t escape, we will bring all wanted men one by one, Shin

दाऊद काय? एक-एक करून सर्वांना आणणार - शिंदे

दाऊद काय? एक-एक करून सर्वांना आणणार - शिंदे

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आपल्या कार्यकाळात सुरक्षा यंत्रणांना हवे असलेले दहशतवादींना अटक केल्यानंतर उत्साहीत असलेल्या केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सोमवारी सांगितले की, भारताचा मोस्ट वॉन्टेंड गुन्हेगार अंडरवर्ल्ड माफिया दाऊद इब्राहीम याला भारतात आणून त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

दाऊदला अटक करून भारतात आणण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. आम्ही एक-एक करून सर्व गुन्हेगारांना भारतात आणणार आहे. त्यामुळे तुम्ही केवळ प्रतिक्षा करा, असेही त्यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणात बेकायदा कारवायांमध्ये हात असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद याला १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटांनंतर मोस्ट वॉन्टेंड दहशतवादी घोषीत करण्यात आले होते. त्याच्यावर मुंबई स्फोटांचा कट रचणे आणि पैसा पुरविल्याचा आरोप लावण्यात आला होता.

अमेरिकेने जाहीर केल्यानुसार दाऊदचे अलकायदा या दहशतवादी संघटनेशी खूप जवळचे संबंध आहे. त्यामुळे अमेरिकेने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यात आले आहे. जगभरातील त्याची संपत्ती जप्त करून त्याच्या काळ्या कृत्यांवर कारवाई करण्याची संयुक्त राष्ट्रात अमेरिकेने मागणी केली आहे. दाऊद सध्या पाकिस्तानात वास्तव्यास असल्याचे म्हटले जात आहे.

गृहमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळात सुरक्षा यंत्रणांना सैयद जबीऊद्दीन अन्सारी उर्फ अबू जंदल, फसीह महमूद उर्फ फसीह मोहम्मद, अब्दुल करीम टुंडा और यासीन भटकळ सहित बरेचसे वॉन्टेंड दहशतवाद्यांना भारतात आणण्यात यश मिळवले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 2, 2013, 19:18


comments powered by Disqus