Last Updated: Tuesday, August 28, 2012, 20:02
www.24taas.com, मुंबई क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबचा उद्या सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे.. कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबईतल्या 26-11 दहशतवादी हल्लाप्रकरणी कसाब हा दोषी आहे.
हायकोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.. या फाशीच्या शिक्षेला कसाबनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं... त्यावर उद्या सुप्रीम कोर्ट निर्णय देणार असल्यानं सा-याचं देशाचं लक्ष त्याकडं लागलंय..
अनेक निरपराध लोकांचे बळी घेतलेत त्या कसाबवर आता पर्यंत तब्बल २६ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. एकाद्या व्हीव्हीआयपीलाही लाजवेल एवढा खर्च कसाबच्या सुरक्षेवर करण्यात आला आहे. आणि माहिती खुद्द गृहमंत्र्यांनीच दिली आहे.
जेवण : ३४ हजार ९७५ रुपये
औषध : २८ हजार ६६ रुपये
बराकीचे बांधकाम : ५ कोटी २५ लाख रुपये
पोलिसांचे वेतन : १ कोटी २२ लाख रुपये
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस: १९ कोटी २८ लाख रुपये
एकूण खर्च : २५ कोटी ७५ लाख १ हजार ४१ रुपये
हा खर्च एखाद्या सरकारी उच्चपदस्थ व्यक्तीवर केला गेला असावा असं तुम्हा वाटलं असेल तर तुमचा अंदाज साफ चुकला आहे. कारण महाराष्ट्र सरकारने हा खर्च केला आहे, २६/११च्या मुंबई हल्ल्यातील कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमिर कसाब याच्यावर. आज पर्यंत राज्य सरकारने कसाबवर २५ कोटी ७५ लाख १ हजार ४१ रुपये खर्च केले आहे... ही माहिती राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनीच दिली आहे.
मुंबई हल्ल्याच्या वेळी निर्दयी अजमल आमिर कसाबने अनेक निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे. मात्र त्याला जीवंत ठेवण्य़ासाठी सरकारला हा खर्च करावा लागतो आहे. कसाबवर आज पर्यंत झालेल्या खर्चाची माहिती सरकारला विचारण्यात आली होती. त्यावर उत्तर देतांना गृहमंत्र्यांनी कसाबवर झालेल्या खर्चाची अकडेवारीच सादर केली आहे. कसाबवर झालेल्या खर्च पाहाता त्याला लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
सध्या कसाबला मुंबईतील आर्थररोड तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. त्याच्यासाठी तुरुंगात स्वतंत्र बराकीचे बांधकाम करण्यात आलं आहे. तुरुंगात कसाबच्या जीवाला धोका होवू नये यासाठी हे विशिष्ट प्रकारचे सेल तयार करण्यात आलं आहे. कसाबच्या सुरक्षेसाठी पोलिसांबरोबरच इंडो-तिबेटियन बॉर्डरचे जवान तैनात करण्यात आले आहेत. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील कसाब हा मुख्य आरोपी असून त्याच्या सुरक्षितते बाबतीत विशेष काळजी घेतली जात आहे. आर्थर रोड तुरुंगात कसाबला दिल्या जाणा-या जेवणाविषयी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. कसाबचं जेवण तयार करण्यासाठी तुरुंगात ६ स्वयंपाकी असल्याचा दावा पाटील यांनी केला होता.
गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी जयंत पाटील यांचा दावा फेटाळून लावत इतर कैद्यांना दिले जाणारे जेवण कसाबला दिलं जात असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलंय. कसाबच्या सुरक्षेवर मोठ्या प्रमाणत खर्च होत आहे. विशेषत: इंडोतिबेटियन बॉर्डर जवानांच्या वेतनाचा खर्च जवळपास १९ कोटी रुपये इतका आहे. तो खर्च केंद्राकडं जमा करावा लागणार आहे. कसाबाच्या जेवणापासून ते त्याच्या सुरक्षे पर्यंत केला जाणाऱ्या खर्चाचा आकडा मोठा असला तरी कसाब हा पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा सबळ पुरावा आहे. त्यामुळेच त्याच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेतली जात असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. मात्र हा खर्च जनतेच्या पैशातून केला जात असून तो आणखी किती काळ सहन करायचा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडाला.
आर्थररोड तुरुंगात कसाबसाठी एक खास सेल तयार करण्यात आलं आहे. कसाबच्या सुरक्षेला कोणताही धोका पोहचू नये हा त्या मागचा उद्देश आहे. कारण कसाबमुळे पाकिस्तानच्या नापाक इराद्या सबळ पुरावाच भारताच्या हाती लागला. त्यामुळेच कसाबच्या सुरक्षेवर मोठा खर्च करण्यात आला. कसाबसाठी तयार करण्यात आलेल्या सेलची सुरक्षा भेदणं भल्याभल्यांना शक्य होणार नाही. आर्थररोड जेलमध्ये शेकडो गुन्हेगार कैदी आहे. किरकोळ गुन्हेगारापासून ते अंडरवर्ल्ड टोळ्यातील कुख्यात गुंडांपर्यंत अनेकांना या जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून या जेलची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. कारण या तुरुंगात कैदी आहे पाकिस्तानचा दहशतवादी अजमल आमिर कसाब.
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील कसाब हा एकमेव जीवंत आरोपी आहे...मुंबईवर हल्ला करण्यासाठी कसाब आणि त्याचे साथिदार पाकिस्तानातून समुद्र मार्गे मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी मुंबईत अक्षरश: दहशत निर्माण केली....या हल्ल्यामागं पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याचं तपासात उघ़ड झालंयं...कसाबच्या अटकेमुळं पाकिस्तानचा तो नापाक डाव जगासमोर आलाय.. त्यामुळंच सुरुवातीपासूनच कसाबच्या सुरक्षीततेसाठी राज्य सरकारकडून विशेष काळजी घेतली जात आहे...
कसाबसाठी आर्थररोड जेलमध्ये ५ कोटी रुपये खर्च करुन बराक बांधण्यात आली आहे...त्यामध्ये ५ ते ६ अंडा सेल आहेत...त्यापैकी एका अंडा सेलमध्ये कसाबला ठेवण्यात आलं आहे... अंडा सेलच्या भिंती रुंदी ६ फुट तर उंची ८ फूट इतकी आहे.. या सेलमध्ये असलेला आरोपी दुसऱ्या आरोपीला पाहू शकत नाही तसेच एकमेकांशी बोलू शकत नाही. अंडा सेलमध्ये आरोपीला आणतांना त्याच्या चेहरा कापडाने झाकला जातो. त्यामुळं अंडा सेलमध्ये कोणत्या आऱोपीला ठेवण्य़ात आलंय याची खबर इतर आरोपांना लागत नाही. अंडा सेलमधील पोलीस कर्मचारीही वेगळेच असतात. जेलमधील इतर पोलीस कर्मचाऱ्यांना अंडा सेलमध्ये जाण्याची परवानगी नसते.
तसेच इतर आरोपींशी अंडा सेलमधील आरोपींचा संबंध येऊ नये यासाठी त्याची संपूर्ण बराक रिकामी ठेवली जाते. कसाबच्या बराकीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक १२ तासानंतर तैनात असलेल्या पोलीसांची ड्यूटी बदलते. तिथं एकदा तैनात केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला पुन्हा तैनात केलं जात नाही. तसेच कसाबशी बोलण्याची तैनात असलेल्या पोलिसांना मनाई करण्यात आली आहे. कसाबच्या अंडा सेल पर्यंत सहजा सहजी पोहचणं अवघड आहे कारण त्यासाठी एक डझनभर दरवाजे पार करावे लागतात. तसेच प्रत्येक दरवाजावर अत्याधुनिक शस्त्रधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आहे.
कसाबला सेलमध्येच टॉयलेट बाथरुमची व्यवस्था करण्यात आली असून त्याच्या बराकीवर हायसेंसिटीव्ह क्लोज सर्कीट कॅमेऱ्यातून चोवीसतास नजर ठेवली जाते. त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कसाबच्या हलचालीवर लक्ष ठेवलं जात असल्याचं बोललं जातं. इतक्या कडक सुरक्षा व्यवस्थेत अजमल कसाबला ठेवण्यात आलं असून त्यावर होणाऱ्या खर्चाचा भूर्दंड सरकारला आणि पर्यंयाने जनतेला सोसावा लागतो. कसाबला फाशी कधी होणार असा सवाल सर्वसामान्य जनता विचारतेय. कारण कसाब निरपराध लोकांना ठार करत असतांना अनेकांनी बघितलंय. कसाबच्या फाशी विषयी जनतेच्या भावना तीव्र असल्या तरी न्यायालयीन प्रक्रियेला छेद देता येणार नाही. मात्र या प्रक्रियेला वेळेची मर्यादा असायला हवी असा सूर आता उमटू लागलाय.
First Published: Tuesday, August 28, 2012, 19:50