Last Updated: Friday, September 28, 2012, 14:33
www.24taas.com, नवी दिल्लीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात दिल्लीच्या तीस हजारी कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. २००८ मधील बिहारी आणि छटपूजेबाबत राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केलं होतं.
या प्रकरणाची सुनावणी सध्या दिल्लीतल्या कोर्टात सुरु आहे. १७ नोव्हेंबरला राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तत्पूर्वी कोर्टानं राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दिल्लीच्याच सब्जी मंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्याचं सांगण्यात येत आहे.
First Published: Friday, September 28, 2012, 14:26