बाबा रामदेवांच्या विद्यापीठातून तरुणी बेपत्ता, Delhi girl goes missing from Baba Ramdev`s Patanjali

बाबा रामदेवांच्या विद्यापीठातून तरुणी बेपत्ता

बाबा रामदेवांच्या विद्यापीठातून तरुणी बेपत्ता

www.24taas.com, झी मीडिया, डेहराडून
योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली विद्यापीठाच्या वसतिगृहातून अठरा वर्षांची तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती आज पोलिसांनी दिली.

बेपत्ता असलेली तरुणी मूळची दिल्लीची असून ती पतंजली विद्यापीठातून योगाचे शिक्षण घेत आहे. गेल्या गुरुवारी विद्यापीठाच्या वसतिगृहातून अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार विद्यापीठ अधिकारी आणि युवतीच्या पालकांनी पोलिसांकडे नोंदविली आहे.

तरुणीच्या वर्गातच शिकणाऱ्या बलजित नावाच्या मित्राने तिला फूस लावून नेले असून तिच्याशी लग्न केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. तरुणीच्या पालकांनीही वेगळी तक्रारही पोलिसांकडे दिली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 24, 2013, 14:04


comments powered by Disqus