ऑफीसात महिलेला पॉर्नसाइट पाहण्यासाठी दबाव, MTNL After Employee Complains Of Sexual Harassment

ऑफीसात महिलेला पॉर्नसाइट पाहण्यासाठी दबाव!

ऑफीसात महिलेला पॉर्नसाइट पाहण्यासाठी दबाव!

www.24taas.com, नवी दिल्ली
सरकारी नोकरी म्हणजे निवांत काम असे काही समीकरण बनले आहे, पण या निवांत कामात टाइमपास करण्याचे प्रकार दिसतात. पण दिल्लीतील एमटीएनएलच्या कार्यालयात अश्लिल वेबसाईट पाहण्याचे प्रकरण समोर आले आहे.

पण प्रकरण इथेच थांबले नाही, तर पुरूष कर्मचार्यां नी कार्यालयातील महिलेवर पॉर्न वेबसाईट पाहण्यासाठी दबाव टाकला आहे. या प्रकरणी कार्यालयात न्याय न मिळाल्याने महिलेने हायकोर्टाचे दार ठोठावले आहे.

दिल्ली हायकोर्टाने टेलिकॉम कंपनी एमटीएनएलकडे लैंगिक शोषणाच्या या तक्रारीबद्दल खुलासा मागितला आहे. तक्रारदार ही एमटीएनएल कंपनीची महिला कर्मचारी असून त्यांनी त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.


पीडित महिलेच्या तक्रारीनुसार त्यांच्या कार्यालयातील पुरूष अश्लिल वेबसाईट पाहात असतात आणि महिलांनीही त्या पाहाव्या यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत असतात.

First Published: Monday, April 8, 2013, 16:31


comments powered by Disqus