चोरी सातशे रुपये, शिक्षा ७ वर्ष! Delhi HC upholds man`s 7-year jail-term for robbing Rs 700

चोरी सातशे रुपये, शिक्षा ७ वर्ष!

चोरी सातशे रुपये, शिक्षा ७ वर्ष!
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

सातशे रुपये चोरल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीला कोर्टानं सात वर्षांची शिक्षा सुनावलीय. दिल्ली सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टानं कायम ठेवलाय.

१९ नोव्हेंबर २००९मध्ये सागर आणि अल्लाउद्दीन नावाच्या दोन तरुणांनी दिल्लीतल्या खजुरी खास पोलीस स्टेशनजवळ एका व्यक्तीला जखमी करुन सातशे रुपये चोरले होते. त्यावेळी सागरकडून एक सुरा, एक देशी पिस्तुल आणि सातशे रुपये पोलिसांनी जप्त केले होते. दिल्ली सत्र न्यायालयाने सागर याला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर पुराव्यांअभावी अल्लाउद्दीनची निर्दोष मुक्तता केली.

मात्र सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सागरनं हायकोर्टात अपिल केलं. आता हायकोर्टानंही सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत, सागरला सात वर्षांची शिक्षा सुनावलीय. आरोपीचं अपिल फेटाळून लावत हायकोर्टाचे न्यायाधिश एस. पी. गर्ग यांनी निकाल कायम ठेवला. आरोपींनी पीडित व्यक्तीस जखमा केल्या होत्या, त्यामुळं शिक्षा कायम ठेवण्यात आल्याचं कोर्टानं म्हटलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 8, 2013, 15:47


comments powered by Disqus