Last Updated: Tuesday, March 4, 2014, 13:27
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअतिथी देवो भव: अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र, दिल्लीत आलेल्या अतिथींना वेगळाच सामना करावा लागत आहे. भारताची राजधानी दिल्लीतील हॉटेल्सचे `डर्टी पिक्चर` जगासमोर आले आहे. खराब हॉटेल्सच्या यादीत दिल्ली नंबर वन आहे.
जगातील अनेक हॉटेल्सची वाईट अवस्था झाली आहे. ट्रायवॅगो रेटिंग एजन्सीच्या अहवालानुसार जगात खराब हॉटेल्सच्या पहिल्या क्रमांकात भारताची राजधानी दिल्ली आहे. तर याच्या उलट इटलीचं सोरेंटो सिटी सर्वात चांगल्या हॉटेल्सच्या यादीत पहिल्या स्थानांवर आहे. ट्रायवॅगो रेटिंग ही जगातील हॉटेल सर्चची सर्वात मोठी साईट आहे. जगातील जवळजवळ सात लाख हॉटेल्सची बुकिंग ट्रायवॅगोवर केली जाते.
ट्रायवॅगोने ८२ लाख लोकांचा पाहाणी अभ्यास केला. या पाहाणी सर्वेक्षणानुसार, मुंबईला ७८.९० टक्के पंसती देऊन ६५वे स्थान मिळाले आहे. मात्र दिल्ली ९०व्या स्थानावर असून ७७.७० टक्के पंसती मिळली आहे. यावर्षी फुटबॉल वर्ल्ड कपचे आयेजन करणारे ब्राझिलला (रियो-डि-जेनेरियो) ९१वे स्थान मिळाले आहे.
याशिवाय मलेशिया (क्वॉलाम्पूर) ९८वे, थायलंड (पटाया) ९५वे, सिंगापूर ९७वे, इंडोनेशिया (बॅंडग) ९८वे, इंडोनेशिया (जकार्ता) ९९वे, आणि फिलिपाईन्स (मनिला) १००वे स्थानवर आहेत. मात्र टॉप दहामध्ये पॉलडच्या तीन हॉटेल्सनी स्थान पटावले आहे. इटलीनंतर जर्मनाचे (ड्रेसडन सिटी) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 4, 2014, 13:27