बुलेट मोदीः दिल्ली आग्रा बुलेट ट्रेन पोहचविणार ९० मिनिटात, delhi to agra in 90 minutes by train like

बुलेट मोदीः दिल्ली आग्रा बुलेट ट्रेन पोहचविणार ९० मिनिटात

बुलेट मोदीः दिल्ली आग्रा बुलेट ट्रेन पोहचविणार ९० मिनिटात

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राथमिक यादीत फास्ट ट्रेन असून दिल्ली आग्रा दरम्यान सर्वात फास्ट ट्रेन चालविण्याची प्रायोगिक तत्वावर सुरू होणाऱ्या रेल्वेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या संदर्भात सर्व पाऊले योग्य रित्या पडली तर दिल्ली आगरा रेल्वे मार्गावर सर्वात जलद रेल्वे धावणार की जी ९० मिनिटात दिल्ली ते आग्रा पोहचणार आहे.

या संदर्भात रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रेल्वे मंत्रालयाचे एक वरिष्ठ अधिकाऱ्याने एका उच्च स्तरीय बैठकीनंतर सांगितले, की, आम्ही दिल्ली ते आग्रा दरम्यान असे रूळ टाकण्याच्या विचारात आहे की ज्यावरून रेल्वे ताशी १६० किलोमीटर रेल्वे जाऊ शकते. आम्ही निरिक्षणासाठी ही प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत रेल्वे सुरक्षा आयुक्ताकडे पाठवू इच्छितो, त्यामुळे या वर्षाच्या शेवटी ही गाडी चालू शकते.

आता भोपाळ शताब्दी एक्स्प्रेसला दिल्लीवरून आग्र्याला पोहण्यासाठी १२६ मिनिट लागतात. या ट्रेनचा सरासरी गती ११० प्रति किलोमीटर या वेगाने जाते. हा वेग १६० किलोमीटर प्रति ताशी झाल्यास ती केवळ ९० मिनिटात हे अंतर कापले जाईल. ट्रेनने हे अंतर २०० किलोमीटर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 30, 2014, 20:31


comments powered by Disqus