सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन पोलिसांना अटक, Delhi woman allegedly gang-raped by cops,4 arrested

सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन पोलिसांना अटक

सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन पोलिसांना अटक

www.24taas.com, झी मीडिया, नोएडा

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका इमारतीमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

खळबळजनक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या नराधमांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. पीडित महिलेच्या राहत्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप अटक करण्यात आलेल्या चौघांविरुद्ध आहे.

आज शनिवार सकाळी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. या चौघांविरु्दध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

नुकतेच मुंबईत महिला छायाचित्रकारावर बलात्कार झाल्याचे प्रकरण घडले. या प्रकरणात पोलिसांनी कर्तव्यदक्षता दाखवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. परंतु, आता पोलीसच बलात्कार प्रकरणाचे गुन्हेगार ठरू लागले असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 31, 2013, 23:02


comments powered by Disqus