जीम ट्रेनरने केला महिलेवर बलात्कार, delhi woman alleges rape by gym trainer

जीम ट्रेनरने केला महिलेवर बलात्कार

जीम ट्रेनरने केला महिलेवर बलात्कार

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दक्षिण दिल्लीतील सरोजनी नगर भागात ३० वर्षीय एका महिलेने आपल्या जीम प्रशिक्षकावर बलात्काराचा आरोप लावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात बुधवारी रात्री तरूणाला त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार काही महिन्यांपूर्वी एनडीएमसीच्या सरोजनीनगरमधील एका जीममध्ये तिने ट्रेनिंग घेण्यास सुरूवात केली. काही आठवड्यांपूर्वी एक तरूणाशी ओळख झाली हा तरूण त्या महिलेला प्रशिक्षण देत होता.

तरुणाने तिच्या शीत पेयात गुंगीचे औषध टाकले, त्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर त्याने बलात्कार केला, असल्याची तक्रार पोलीसांकडे दाखल करण्यात आली आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 25, 2014, 13:09


comments powered by Disqus