हनीमूनला पतीने केले पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, पती फरार, delhi woman claims husband mercilessly rap

हनीमूनला पतीने केले पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, पती फरार

हनीमूनला पतीने केले पत्नीवर <b><font color=#A30A2A>अनैसर्गिक अत्याचार</font></b>, पती फरार
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
हनीमून हे प्रत्येक जोडप्याच्या आठवणीतील क्षण.... पण एका नवविवाहित महिलेला वेगळ्याच कारणाने हनीमूनच्या कटू आठवणी कायम त्रास देत राहणार आहे. बँकॉक आणि थायलंडमध्ये हनीमूनला गेले असता पतीने अनैसर्गिक आमि क्रूरतेने बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने लावला आहे.

२३ वर्षीय पीडित महिलेने आपल्या कुटुंबियांसह काल रात्री पोलिसांमध्ये ही तक्रार दाखल केली. भारतीय दंड संहिताच्या विविध कलमांतर्गत पीडित महिलेचा पती पुनीत भारद्वाज याच्यावर प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेला दिल्लीच्या दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले. त्या तपासणी केली असता बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. महिलेवर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असलेला महिलेचा पती सध्या फरार आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसाचे पथक रवाना झाले आहे.

हनीमूनमध्ये पतीने पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. सुरूवातीला तिला मालदीव घेऊन जाणार होता. पण नंतर त्याने तिला बँकॉकला नेले. पीडित महिलाही एका खासगी कंपनीत काम करते. २९ नोव्हेंबर रोजी दोघांचे अरेंज मॅरेज झाले होते. १ डिसेंबरला दोघे बँकॉकला हनीमूनला गेले होते. ते ८ डिसेंबरला बँकॉकहून दिल्लीला परतले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 13, 2013, 12:01


comments powered by Disqus