मोदी बंदर न जाने अदरक का स्वाद, delhi woman commission call modi monkey

मोदी बंदर न जाने अदरक का स्वाद

मोदी बंदर न जाने अदरक का स्वाद

www.24taas.com, नवी दिल्ली


बंदर क्या जाने अदरक का स्वाद, असा शेर म्हणून मोदी यांना दिल्ली महिला आयोगाने माकड म्हटले आहे. शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांना ५० कोटींची गर्लफ्रेंड म्हटल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गप्प बसणे पसंत केले पण आता त्यांच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये दिल्लीतील महिला आयोग सामील झाले आहे.

सुनंदा पुष्कर यांना ५० कोटींची गर्लफ्रेंड म्हटल्याबद्दल दिल्लीच्या महिला आयोगाने तीव्र आक्षेप घेतला आहे. आयोगाच्या अध्यक्ष बरखा सिंह यांनी मोदी यांनी सुनंदा पुष्कर यांची माफी मागावी असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी एक शेरही म्हटला नफरतें पालना दुर्भाग्यी रहा हो जिसका, वो किसी रिश्तेस की अजमत कहां पहचानता है। प्यारर को पैसे में तौलने वाले से कहो, कोई बंदर अदरक का मजा जानता है`

नरेंद्र मोदींसारख्या सुशिक्षित व्यक्तीला अशा प्रकारे वक्तव्य करणे शोभत नाही. थरूर यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळाल्यानंतर मोदी यांनी त्यांच्यावर टीका करत म्हटले की त्यांची पत्नी एके काळी ५० कोटींची गर्लफ्रेंड होती.

First Published: Friday, November 2, 2012, 10:51


comments powered by Disqus