मित्रांनी कोल्डड्रींकमधून नशा देऊन केला बलात्कार,Delhi: Woman made ​​unconscious by drugs, gang rape by friends

मित्रांनी कोल्ड ड्रींकमधून नशा देऊन केला बलात्कार

मित्रांनी कोल्ड ड्रींकमधून नशा देऊन केला बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीत पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. एका महिलेला मित्रांनी कोल्डड्रींग दिले. मात्र, त्यामध्ये मादक पदार्थ टाकला. ती महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिच्याच मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला.

पूर्व दिल्लीतील मधुविहारमध्ये ही पिडीत महिला राहते. तिच्या दोन मित्रांनी हे कृत्य केलं. रवींद्र आणि लोकेंद्र यांनी या महिलेला कोल्डड्रींकमधून मादक पदार्थ दिला. ही घटना घडत असताना राकेश आणि जयसिंग हे सहकारीही तिथे उपस्थित होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पिडीत महिला आणि तिचे हे सहकारी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगरमध्ये एका कंपनीत कामाला होते. बुधवारी तिचे सहकारी तिला एका कारमध्ये घेऊन गेले. रस्त्यातच त्यांनी तिला शीतपेय पिण्यास दिले ज्यात काही मादक पदार्थ मिसळलेले होते आणि ती बेशुद्ध असताना त्या दोघांनी बलात्कार केला.

पोलिसांना बुधवारी रात्री ही महिला दिलशाक गार्डन परिसरात बेशुद्धवस्थेत सापडली. पिडीत महिलेच्या रिपोर्ट काढण्यात आला. तेव्हा बलात्कार झाल्याचे निदर्शनास आले. यासंबधीचे आरोपी फरार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, July 5, 2013, 12:58


comments powered by Disqus