किंगफिशर एअरलाईन्सला दणका, DGCA suspends Kingfisher`s flying license

किंगफिशर एअरलाईन्सला दणका

 किंगफिशर एअरलाईन्सला दणका
www.24taas.com,नवी दिल्ली

कर्जाच्या खाहीत लोटलेल्या आणि कर्मचाऱ्यांचे पगार थकविलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला मोठा दणका मिळाला आहे. किंगफिशरचा नागरी हवाई परवाना रद्द करण्याचा निर्णय आज शनिवारी नागरी उड्डाण महासंचालकांनी घेतला आहे. त्यामुळे किंगफिशर कायमचे जमिनीवर राहणार आहे.

किंगफिशर एअरलाईन्सला महासंचालकांनी (डीजीसीए) काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसचे उत्तर देण्यात किंगफिशर एअरलाईन्स असमर्थ ठरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील आदेश येईपर्यंत किंगफिशर एअरलाईन्सला उड्डाण करता येणार नसल्याचे डीजीसीएने कारवाई करताना म्हटले आहे.

उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या मालकिच्या किंगफिशऱ एअरलाईन्स गेल्या काही दिवसांपासूनच अडचणीत होती. कर्मचाऱ्यांचे वेतन, वैमानिकांचा संप अशा अनेक गोष्टींना किंगफिशरला सामना करावा लागला होता. आता तर परवाना रद्द करण्याचा निर्णय झाल्याने मल्ल्या आणखीनच अचणीत आले आहेत. किंगफिशला वाचविण्यासाठी मुंबई आणि गोव्यातील संपत्तीवर टाच आणण्याच्या हालचाली होत्या. त्यांचा लिलाव करण्याची शक्यताही वर्तवली गेली होती. त्यामुळे मल्ल्यांना मोठा धक्का बसला होता.

First Published: Saturday, October 20, 2012, 16:04


comments powered by Disqus