धोनीचा भाऊ गेला समाजवादी पक्षात Dhoni`s brother, Narendra, joins Samajwadi Party

धोनीचा भाऊ गेला समाजवादी पक्षात

धोनीचा भाऊ गेला समाजवादी पक्षात
www.24taas.com, झी मीडिया, लखनौ

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा मोठा भाऊ नरेंद्रसिंह धोनी यांनी रविवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. नरेंद्रसिंह धोनी यांनी सपचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची त्यांच्या लखनौमधील निवासस्थानी जाऊन भेट घेत पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला.

आगामी लोकसभा निवडणुकांनंतर झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरच धोनी यांनी सपमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे.

धोनी यांनी यापूर्वी 2009 मध्ये भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारही केला होता. मात्र, आता त्यांनी सपमध्ये प्रवेश केला आहे. मुलायमसिंह यादवांच्या भेटीवेळी धोनी यांच्याबरोबर झारखंडचे प्रदेशाध्यक्ष मिरज खान आणि प्रभारी काशिनाथ यादव हे देखील होते.

धोनी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत रांची मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 16, 2013, 20:41


comments powered by Disqus