गोव्यात डिझेलपेक्षा पेट्रोल स्वस्त, Diesel is cheaper than petrol in Goa

गोव्यात डिझेलपेक्षा पेट्रोल स्वस्त

गोव्यात डिझेलपेक्षा पेट्रोल स्वस्त
www.24taas.com, झी मीडिया,पणजी

देशात पेट्रोल डिझेलपेक्षा स्वस्त हे ऐकूण हैराण झालात ना. मात्र, ही गोष्ट खरी आहे. गोव्यात डिझेल पेट्रोलपेक्षा स्वस्त मिळत आहे.

शुक्रवारी डिझेलच्या किमतीत एक रूपयांनी वाढ झाली. त्यानंतर गोव्यात डिझेलची किंमत एक रूपयांनी वाढल्याने पेट्रोल किमतीपेक्षा डिझेल महाग झाले आहे. गोव्यात पेट्रोल आता स्वस्त झाले आहे.

गोव्यात पेट्रोल ५२.१० रूपये प्रति लिटर आहे. मात्र, ९० पैशांची भर पडल्याने डिझेल ५२.७० रूपये प्रति लिटर झाले आहे. गोव्यातील भाजप सरकराने २०१२च्या निवडणुकीत पेट्रोलवरील व्हॅट कमी केला. त्यानुसार ०.१ टक्के व्हॅट कमी करण्यात आला. त्यामुळे गोवा राज्यात पेट्रोलच्या किमती कमी झाल्यात.

देशात सर्वात कमी गोव्यात पेट्रोलची किंमत आहे. व्हॅट कमी केल्याने गोव्यात पेट्रोलची किंमत ११ रूपयांनी कमी झाली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 12, 2013, 13:40


comments powered by Disqus