Last Updated: Friday, March 22, 2013, 20:42
www.24taas.com, नवी दिल्लीडिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. लीटरमागे ४५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. हे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या दरात घसरण झाल्याने पेट्रोलचे दर कमी करताना तेल कंपन्यांनी डिझेलचे दर मात्र जैसे थे ठेवले होते.
पुन्हा एकदा डिझेलचे भाव वाढविण्यात आले आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चाट बसणार आहे. यावर्षी जानेवारीपासून तीन महिन्यात तिसऱ्यांदा ही दरवाढ करण्यात आली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने डिझेलची दरवाढ टाळली होती.
संसद एक महिन्यासाठी संस्थगीत करण्यात आल्यानंतर लगेचच इंडियन ऑईलने डिझेल दरवाढ जाहीर केली. नव्या दरानुसार मुंबईत आता डिझेलसाठी लीटरमागे ५४ रुपये २६ पैशांऐवजी ५४.८३ रुपये मोजावे लागणार आहेत.
First Published: Friday, March 22, 2013, 20:42