Last Updated: Wednesday, August 28, 2013, 10:01
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई रुपयाच्या घसरणीचा फटका डिझेलच्या दरांवर होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनानंतर डिझेलच्या किंमतीत तीन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
रुपयाच्या घसरलेल्या किंमतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चे तेल घेण्यासाठी मोठी किंमत तेल कंपन्यांना मोजावी लागत आहे. हा बोजा कमी करण्यासाठी डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रुपयाची घसरती किंमत ही चिंतेची बाब असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनीही मान्य केलं.
दरम्यान, बुधवारी रुपयांला डॉलरच्या तुलनेत आणखी मोठा धक्का बसलाय. रुपयाच्या तुलनेत मंगळवारीच सर्वात खालची पातळी गाठलेल्या रुपयानं आज त्याहूनही खालची पातळी गाठलीय. आज बाजार उघडताच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ११८ पैशांनी रुपया कोसळला. सध्या एका डॉलरसाठी तब्बल ६७.४२ पैसे मोजावे लागत आहेत. हा रुपयांचा आत्तापर्यंत सर्वांत मोठा निचांक आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, August 28, 2013, 10:01