गडकरींच्या वक्तव्यावरून दिग्गीराजांचं मोदींना आव्हान Digvijay singh challenges Modi

गडकरींच्या वक्तव्यावरून दिग्गीराजांचं मोदींना आव्हान

गडकरींच्या वक्तव्यावरून दिग्गीराजांचं मोदींना आव्हान
www.24taas.com, नवी दिल्ली

गडकरींनी स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांच्या आयक्यू पातळीबद्दल केलेल्या तुलनेचा सर्व थरांतून निषेध होत आहे. यामध्ये काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंगदेखील मागे नाहीत. त्यांनीही संधीचा फायदा घेत गडकरींवर आणि गडकरींवर तोफ डागली आहे.

दिग्विजय सिंग यांनी ‘ट्विटर’वर लिहिलं, “गडकरींनी भोपाळच्या एका कार्यक्रमात स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा आयक्यू समान असल्याचं म्हटलं आहे. यावर आता मोदी आणि त्यांच्या समर्थकांचं काय म्हणणं आहे?”

मनोवैज्ञानिक आधारावर स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा आयक्यू समान असल्याचं गडकरींनी काल म्हटलं होतं. यावर दिग्विजय सिंग आणखी म्हणाले “जरी स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचे आयक्यू समान असतील, तरी एकाने त्याचा वापर गुन्हे करण्यासाठी केला तर दुसऱ्या व्यक्तीने देशाचं नाव, अध्यात्म जागतिक पातळीवर उंचावण्याचं महान कार्य केलं. लोक माझ्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित करतात. पण मी जे काही बोललो, ते नेहमी खरं ठरलं आहे. गडकरी व्यापारी आहेत, असं मी म्हटलं होतं. ते ही खरंच ठरलं.”

First Published: Monday, November 5, 2012, 17:27


comments powered by Disqus