सात लग्न केले, आठवे करताना पकडला गेला..., divestiture of a man looking for 8th marriage

सात लग्न केले, आठवे करताना पकडला गेला...

सात लग्न केले, आठवे करताना पकडला गेला...

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ

भोपाळमध्ये एका व्यक्तीने सात लग्न केले पण सातही मुलींना माहिती नव्हते की त्याचे लग्न झाले आहे. आठवं लग्न करण्याचा डाव त्याने आखला होता, परंतु, सातव्या पत्नीने त्याचे बिंग उघडे पाडले आणि त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी हुंडा विरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. फरार झालेल्या या व्यक्तीला पकडण्यासाठी आता पोलिसांनी जागोजागी फिल्डिंग लावली आहे. आरोपीचे नाव शहजाद अली असे असून त्याने जेवढे लग्न केले किंवा निकाह केले ते सर्व बनाव असल्याचे समोर आले आहे. या लग्नांचे सर्टीफिकेट अशा संस्थांकडून घेण्यात आले की, ज्यांना अशा प्रकारे सर्टीफिकेट देण्याचा अधिकारच नाही.

भोपाळमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय झीनत हीने पोलिसांकडे तक्रार केली. त्याने एक वर्षांपूर्वी तिला पाहिले आणि तिचा पाठलाग सुरू केला. तेव्हा ती कम्प्युटर कोर्स करीत होती. पहिल्या दिवशी तो काहीही बोलला नाही. नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी त्याने पाठलाग केला. जशी संधी मिळाली तसे त्याने प्रपोज केले. अलीने झीनतला अशी काहाणी ऐकवली की तिचे मन जिंकले. त्याने सांगितले की तो चांगल्या घरातील आहे आणि तिच्याशी निकाह करण्याची इच्छा आहे.

माझ्या कुटुंबियांशी त्याने धार्मिक चर्चा केली आणि त्यांचेही मन वळविले. त्याला मुलींना पटविण्याची ट्रिक त्याला येत होती. हिंदू मुलीला फसविण्यासाठी तो मंदिरासमोर उभा असायचा. हातात धागे बांधायचा. मंदिरात जाऊन घंटा वाजवायचा. हिंदू मुलींना तो आपले नाव राज सांगायचा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 7, 2014, 16:52


comments powered by Disqus