डीएमकेने यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला, DMK pulls out of UPA government

डीएमकेने यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला

डीएमकेने यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला
www.24taas.com, नवी दिल्ली

यूपीए सरकारचा पाठिंबा डीएमकेने काढून घेतला आहे. यूपीएमधून डीएमके बाहेर पडली आहे. डीएमकेनं पाठिंबा काढून घेतल्याने सरकारचा धोका वाढला आहे. डीएमकेच्या तीनही मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. श्रीलंकन तमिळींच्या मुद्द्यावर डीएमके नाराज असल्याने डीएमकेने आपला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे यूपीए सरकारकडे आता फक्त २३० खासदार आहेत. तर केंद्र सरकारला ५८ खासदारांचा पाठिंबा आहे, मात्र त्यामुळे सरकारचा धोका वाढला आहे.

यूपीएमध्ये डीएमकेचे १८ खासदार गेल्याने सरकारची चांगलीच गोची होण्याची शक्यता आहे. सरकारस्थापनेसाठी बहुमताचा आकडा २७२ आहे. डीमएकेची मनधरणी करण्यासाठी सरकारडून एक कोअर कमिटीदेखील बनविण्यात आली होती.

या कमिटीमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग, एके अँन्थोनी, पी. चिदंबरम आणि अहमद पटेल हे सहभागी होती. त्यामुळे डीमएकेच्या मनधरणीसाठी सरकारने चांगली मोर्चेबांधणी केली होती.

First Published: Tuesday, March 19, 2013, 11:47


comments powered by Disqus