इंटरनेटसाठी डोकोमोचा ‘चीपेस्ट’ दर..., docomo gives cheapest rate for internet

इंटरनेटसाठी डोकोमोचा ‘चीपेस्ट’ दर...

इंटरनेटसाठी डोकोमोचा ‘चीपेस्ट’ दर...
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या रोज काही ना काही नवीन फंडे आजमावतात. इंटरनेटची सुविधाही आता सामान्यांना परवडू लागलीय त्यामुळे स्वस्तात इंटरनेट उपलब्ध करून देण्याच्या स्पर्धेत अनेक कंपन्यांमध्ये चुरस लागलीय. या स्पर्धेत आता ‘टाटा डोकोमो’नं एक पाऊल पुढे टाकलंय.

आता ‘टाटा डोकोमो’ इंटनेटरच्या प्रति किलोबाईटसाठी १० पैशांऐवजी केवळ १ पैसा असा दर आकारणार आहे. तब्बल ९० टक्क्यांनी ही घट करण्यात आलीय. एक जुलैपासून ही घट लागू करण्याची घोषणा कालच कंपनीने केली.

‘टाटा डोकोमो’चे विपणन प्रमुख गुरिंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ऑफर जास्तीत जास्त विभागात चालवण्यात येईल आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत ही पोचवण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.


कंपनीने लावलेले नवीन दर खालीलप्रमाणे असतील…
‘टू जी’साठी मोबाइल इंटरनेट : १२६ रुपये (३० दिवसांसाठी, २ जीबी), १४९ रुपये (३० दिवसांसाठी २.५ जीबी), आणि २४९ रुपये (६० दिवसांसाठी ३ जीबी)

‘थ्रीजी’साठी २५५ रुपये (३० दिवसांसाठी २ जीबी)

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 26, 2013, 13:10


comments powered by Disqus