डॉक्टरने केली गर्भवतीकडे सेक्सची मागणी, Doctor arrested for indecent proposal

डॉक्टरने केली गर्भवतीकडे सेक्सची मागणी

डॉक्टरने केली गर्भवतीकडे सेक्सची मागणी

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
माझ्याशी सेक्स कर मी मेडिकल बिल आणि फी माफ करेल.... अहमदाबादच्या एका डॉक्टरने अशी सेक्सची मागणी करून डॉक्टरी पेशाला काळिमा फासला.

रुटीन चेकअपसाठी येणाऱ्या एका गर्भवती महिलेकडे सेक्सची मागणी या वासनांध डॉक्टराला खूपच महागात पडली. महिलेच्या कुटुंबियांना या डॉक्टरला त्यानंतर बेदम चोप दिला.

कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉक्टराला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २८ वर्षीय एक गर्भवती महिला रुटीन चेकअपसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सोहम दलाल यांच्याकडे जात होती.

गुरूवारी रूटीन चेकअप दरम्यान डॉक्टरांनी महिलेसमोर सेक्सचा विचित्र प्रस्ताव ठेवला. तेव्हा ती सुन्न झाली. डॉक्टरने महिलेला सांगितले की, शरीर संबंध ठेवले तर तो मेडिकल फी माफ करेल.

महिलेने घरी पोहचून डॉक्टरची तक्रार आपल्या पतीकडे केली. शुक्रवारी सकाळी संतापलेल्या कुटुंबियांनी हॉस्पिटलवर हल्लाबोल केला. लोकांनी हॉस्पिटलवर दगडफेक केली, तसेच तेथील फर्निचरची तोडफोड केली.

दरम्यान डॉक्टर या ठिकाणी पोहचला, तेव्हा संतापलेल्या कुटुंबियांनी त्याला जोरदार चोप दिला. पोलिसांनी मध्यस्थी करून डॉक्टराला वाचविले. डॉक्टरावर गुन्हा दाखल केला असून जखमी असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, June 29, 2013, 17:39


comments powered by Disqus