पत्नी-सासू-सासऱ्यांची हत्या करून डॉक्टरची आत्महत्या!, Doctor ends life after killing wife, in-laws and baby

पत्नी-सासू-सासऱ्यांची हत्या करून डॉक्टरची आत्महत्या!

पत्नी-सासू-सासऱ्यांची हत्या करून डॉक्टरची आत्महत्या!
www.24taas.com, झी मीडिया, इंदौर

इंदौरमध्ये अंगावर काटा उभा करणारं एक हत्याकांड घडलंय. रागाच्या भरात काय काय घडू शकतं, याचंच हे थरारक दृश्यं आहे.

इंदौर शहरातल्या बखतगड टॉवरमधल्या रेडियोलॉजिस्ट डॉ. रोहित त्रिवेदी यांनी आपली पत्नी एमएजीएम मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर डॉ. प्रियांका पांडे-द्विवेदी, सासरे पी. सी. पांडे आणि सासू सावित्री पांडे यांची हत्या केलीय. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदौरच्या एका डॉक्टर दाम्पत्यामध्ये झालेल्या किरकोळ भांडणानं तीन हत्या घडवल्या आहेत. पतीसोबत भांडण झाल्यानंतर डॉक्टर पत्नीनं आपल्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा गळा दाबून तिची हत्या केली. आपल्या चिमूरडीला आपल्यासमोर तडफडून मरताना पाहून संतापलेल्या पित्यानं आपल्या पत्नी, सासू आणि सासऱ्यांवर धारदार शस्त्रानं वार केले... यामध्ये सासू-सासरे जागीच मृत्युमुखी पडले. पत्नी, सासू आणि सासऱ्यांना मृत पडलेलं पाहून डॉक्टर पतीनंही स्वत:ला फाशी लावून आत्महत्या केली.

इंदौरमध्ये घरगुती कलहांवरून रंगणारा हा रक्ताच्या होळीचा खेळ दुसऱ्यांदा घडलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, September 2, 2013, 17:11


comments powered by Disqus