महिलेने कापले डॉक्टरचे लिंग, पत्नीला केले कुरिअर, doctor killed in Uttar Pradesh

महिलेने कापले डॉक्टरचे लिंग, पत्नीला केले कुरिअर

महिलेने कापले डॉक्टरचे लिंग, पत्नीला केले कुरिअर
www.24taas.com, झी मीडिया, कानपूर

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. महिलेने डॉक्टरचे लिंग कापले आणि ते त्याच्या पत्नीला कुरिअर केले. याची कबुली पिडीत महिलेनेच पोलिसांना दिली. ही धक्कादायक माहिती दिल्याने पोलीसही हैराण झालेत.

आपण बारावीत असल्यापासून हा डॉक्टर माझ्यावर अत्याचार करीत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची माझ्या बहिणीवर वाकडी नजर पडली होती. माझ्यावर अत्याचार केल्याचे मी सहन केले. मात्र, त्याने बहिणीकडे वाकडी नजर टाकल्याने मी ठरविले. त्यानुसार ४२ वर्षीय डॉक्टरचे गुप्तांग कापून त्याच्याच पत्नीला कुरिअर करण्याचे ठरविले. त्याचे गुप्तांग मी कुरिअरने त्याच्या घरी पत्नीला पाठविले, अशी कबुला पिडीत तरूणीने पोलिसांना दिली.

माझ्या बहिणीवर अत्याचार करण्याच्या तो डॉक्टर होता. त्यामुळेच मी त्याची गेस्ट हाऊसमध्ये धारदार शस्त्राने हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याठिकाणी रक्ताने लिहिले. निसर्ग नियमाच्या विरोधात जाणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यानंतर त्याचे गुप्तांग कापून त्याच्याच पत्नीला कुरिअर केले, असे तिने सांगितले.

एका गेस्ट हाऊसमध्ये कानपूरमधील डॉक्टर सतीश चंद्र यांचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही धक्कादायक घटना उघडकीस आलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, July 27, 2013, 15:30


comments powered by Disqus