महिलेवर तीन वर्षांपूर्वी बलात्कार; डॉक्टरला अटक, doctor raped woman with partners in south delhi

महिलेवर तीन वर्षांपूर्वी बलात्कार; डॉक्टरला अटक

महिलेवर तीन वर्षांपूर्वी बलात्कार; डॉक्टरला अटक

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दक्षिण दिल्लीच्या हौजखास भागात एका ४० वर्षीय महिलेवर एका डॉक्टरवर आणि त्याच्या सहकाऱ्यांनीवर बलात्कार केल्याच्या घटनेनं एकच गोंधळ उडालाय.

संबंधित महिलेनं एका डॉक्टरनं त्याच्या आणखी दोन साथीदारांसह आपल्यावर तीन वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा आरोप केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेनं आपल्यावर तीन जणांनी तीन वर्षांपूर्वी बलात्कार केला परंतु, त्यावेळेस पोलिसांकडे जाऊन तक्रार करण्याची तिची हिंमत झाली नाही. परंतु, तीन वर्षानंतर या महिलेनं पोलिसांकडे जाऊन अखेर तक्रार दाखल केलीय.

तक्रारीवर कारवाई करत पोलिसांनी ४० वर्षीय आरोपी विकास याला अटक केलीय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 1, 2014, 18:28


comments powered by Disqus