मोदींच्या खास सूचना, Don`t touch my feet, work hard and be good parliamentarians: Modi tells new MPs

खासदारांना मोदींच्या खास सूचना, पाया पडू नका!

खासदारांना मोदींच्या खास सूचना, पाया पडू नका!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

संसदेत येताना खासदारांनी चांगला अभ्यास करुन येणे. त्यांची नियमीत उपस्थित असवी तसेच त्यांनी कोणाच्याही पाया पडू नका आणि माझ्या पाया पडू नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत.

भाजपच्या संसदीय बैठकीत मोदींनी खासदारांना संसदेत नियमीतपणे हजर रहावे, संसदेत येताना दररोज अभ्यास करून यावा. संसदेत चांगले वर्तन ठेवा आणि जबाबदारीने बोलावे अशा सूचना केल्यात. तसेच दरवेळी आपल्या ज्येष्ठ नेत्यांचे चरण स्पर्श करण्यात वेळ घालवू नका स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कामावर भर द्या, असेही पंतप्रधान म्हणाले आहेत.

मोदी यांनी आज केंद्रीय मंत्र्याना जबाबदारीचे वाटप केले. केंद्रीय राज्यमंत्रीमंडळ सक्षम बनविण्याचे दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप खासदारांना खास सूचना केल्यात. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयातून सर्व केंद्रीय राज्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात आली आहेत. यामध्ये आपली जबाबदारी आणि खाते योग्यरितीने सांभाळावे असे म्हटलेय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 6, 2014, 19:23


comments powered by Disqus