मुलीचे झाले लग्न, आई मात्र अनभिज्ञ! douter marride but mom is not informe

मुलीचे झाले लग्न, आई मात्र अनभिज्ञ!

मुलीचे झाले लग्न, आई मात्र अनभिज्ञ!
www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्ली

नवी दिल्लीच्या एअरपोर्टवर काम करणाऱ्या तरुणीच्या अपहरणाचे प्रकरण आता मिटले आहे. तिचा शोध आता लागला आहे. पोलिसांनी लावलेल्या तपासात असे शोधून काढले की, ती मुलगी अल्पवयीन नसून २३ वर्षाची आहे आणि तिचे लग्न झालेले आहे हे तपासात उघडकीस आले.

तरुणीच्या आईने आयजीआय या पोलीस चौकीत अशी तक्रार नोंदिवली होती की, तिच्याबरोबर काम करणाऱ्या दीपकने तिचे २ ऑगस्टला अपहरण केले आहे. त्या मुलीच्या आईने तिचे वय १७ असे सांगितले होते, परंतु, तिच्या जन्माचा एकही पुरावा आपल्याजवळ नसल्याची माहिती तिच्या आईने दिली. आपल्या मुलीचे लग्न झालेले नाही असेही म्हणाली होती. या गोष्टींच्या आधारे पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली होती.

तरुणीचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केल्यानंतर किशोरीने सांगितले की, “मी अल्पवयीन नसून माझे वय २३ आहे आणि मी स्वतः दीपकसोबत गेली होती, माझे त्यांच्याशी लग्न झालेले आहे,” अशी कबुली तिने कोर्टातदेखील दिली. तरुणी आणि तिचा पती मूळचे बिहारचे आहेत.

तरुणीने खूप आधी दीपकशी लग्न केले होते आणि ही गोष्ट तिच्या आईला माहिती नाही तिने हे लपून ठेवले होते अशी कबुली तिने पटियाला हाऊसमधील एम. एम. अशोक कुमार यांच्यासमोर दिली आहे.

First Published: Wednesday, August 7, 2013, 18:53


comments powered by Disqus